विश्वासणार्यांमध्ये फिर्याद
1 जर तुमचा कोणाविरुद्ध वाद असल्यास, तो प्रभूच्या लोकांकडे न नेता, एखाद्या अनीतिमान न्यायाधीशाकडे नेण्याचे धैर्य कसे करता? 2 आपण प्रभूचे लोक जगाचा न्याय करणार आहोत, हे तुम्हाला माहीत नाही काय? असे असताना, तुम्ही या क्षुल्लक गोष्टींचा आपसात न्याय करण्यास समर्थ नाही का? 3 आपण स्वतः देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? तर त्याच्या तुलनेत या जगाच्या गोष्टी काहीच नाहीत. 4 जर अशा गोष्टीसंबंधी तुमच्यात वाद आहेत, तर तुमच्या मंडळीशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना तुम्ही न्याय करावयास कसे लावता? 5 तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का?