11 याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे;
गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो,
पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे!
याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे;
तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.
12 श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात;
तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात.
सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता
केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.
14 "परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत. 15 आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील.