एलीयाहद्वारे मोठ्या दुष्काळाची घोषणा
1 गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह17:1 एलीयाह मूळ प्रतीमध्ये बहुतेक ठिकाणी हे नाव एलीयाहू असे लिहिलेले आहे तिश्बे अहाबाला म्हणाला, "याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही."