10 तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली. 11 आणि तिने एक शपथ घेतली, ती म्हणाली, "हे सर्वसमर्थ याहवेह, जर तुम्ही तुमच्या दासीच्या दुर्दशेकडे लक्ष द्याल आणि माझी आठवण कराल आणि तुमच्या दासीला विसरणार नाही परंतु तिला एक पुत्र द्याल, तर मी त्याला त्याच्या आयुष्याचे सर्व दिवस याहवेहसाठी देईन आणि त्याच्या डोक्यावर कधीही वस्तरा फिरणार नाही."
15 "तसे नाही, माझ्या स्वामी," हन्नाहने उत्तर दिले, "मी फार त्रस्त झालेली स्त्री आहे. मी द्राक्षारस किंवा मद्य घेतले नाही; मी माझे हृदय याहवेहकडे मोकळे करीत होते.
17 तेव्हा एलीने उत्तर दिले, "शांतीने जा, आणि तू जे काही मागितले आहेस, ते इस्राएलचे परमेश्वर तुला देवो."
20 तेव्हा नेमलेल्या काळात हन्नाह गर्भवती झाली आणि एका पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शमुवेल1:20 शमुवेल इब्री भाषेत याचा अर्थ परमेश्वराने ऐकलेला असे ठेवले, ती म्हणाली, "कारण याहवेहकडे मी याला मागितले होते,"