Pular para o conteúdo
Publicidade

1 शमुवेल 27

दावीद पलिष्ट्यांमध्ये जातो

1 परंतु दावीदाने आपल्या मनात म्हटले, "कधी तरी मी शौलाच्या हातून मरणारच आहे. पलिष्ट्यांच्या देशात पळून जाणे उत्तम आहे. मग शौल इस्राएलमध्ये माझा शोध करण्याचे सोडून देईल आणि मी त्याच्या हातातून निसटून जाईन."

2 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले. 3 दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या. 4 जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही.

5 नंतर दावीद आखीश राजास म्हणाला, "जर आपल्या दृष्टीत मी कृपा पावत असलो तर, मला देशातील एका गावात जागा द्या म्हणजे मी तिथे राहीन. आपल्या सेवकाने या राजकीय शहरात तुमच्याबरोबर का राहावे?"

6 म्हणून आखीशने त्या दिवशी त्याला सिकलाग हे शहर दिले. आणि तेव्हापासून ते यहूदीयाच्या राजांचे आहे. 7 दावीद पलिष्ट्यांच्या हद्दीमध्ये एक वर्ष चार महिने राहिला.

8 नंतर दावीद आणि त्याच्या माणसांनी गशूरी, गिरजी आणि अमालेकी या लोकांवर छापा टाकला. (पुरातन काळापासून हे लोक शूर शहरापासून इजिप्तपर्यंत वाढत गेलेल्या प्रदेशात राहत होते.) 9 जेव्हा दावीद कोणत्याही प्रांतावर हल्ला करीत असे तो एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत सोडत नसे, परंतु तेथील मेंढरे, गुरे, गाढवे व उंट आणि वस्त्रे यांची लूट घेत असे. नंतर तो आखीशकडे परत आला.

10 जेव्हा आखीशने विचारले, "आज तुम्ही कोणत्या प्रांतावर स्वारी केली?" दावीद त्याला उत्तर देत असे, "यहूदीयाच्या नेगेव विरुद्ध" किंवा "यरहमेल्यांच्या नेगेव विरुद्ध" किंवा "केनीयांच्या नेगेव विरुद्ध." 11 त्याने गथ येथे आणण्यासाठी एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नव्हते, कारण त्याला वाटले, "ते आमच्याबद्दल सांगतील आणि म्हणतील, ‘दावीदाने असे केले आहे.’ " आणि जोपर्यंत तो पलिष्ट्यांच्या सीमेत राहिला तोपर्यंत तो असेच करीत असे. 12 आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, "तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील."

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.