22 तेव्हा हन्नाह गेली नाही. ती तिच्या पतीला म्हणाली, "मुलाचे दूध तोडल्यानंतर, मी त्याला घेऊन जाईन आणि त्याला याहवेहसमोर सादर करेन आणि तो सदैव1:22 सदैव मूळ प्रतींनुसार त्याच्या जीवनाच्या सर्व दिवसांपर्यंत मी त्याला नाजीर म्हणून समर्पण केले आहे. तिथेच राहील."
23 "तुला जे उत्तम वाटते ते तू कर," तिचा पती एलकानाह तिला म्हणाला. "त्याचे दूध तुटेपर्यंत तू येथेच राहा; याहवेह त्यांच्या वचनाप्रमाणे करो." म्हणून ती स्त्री घरीच राहिली आणि मुलाचे दूध तोडेपर्यंत तिने त्याचे पालनपोषण केले.
24 त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल,1:24 मूळ प्रतीनुसार तीन बैल. एक एफा1:24 अंदाजे 16 कि.ग्रॅ. सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले.