11 तेव्हा त्यांनी इशायला विचारले, "तुझे पुत्र येण्याचे पूर्ण झाले काय?"
इशायाने उत्तर दिले, "अजून एक जो सर्वात लहान आहे, तो रानात मेंढरे राखीत आहे."
शमुवेल म्हणाले, "त्याला बोलाविणे पाठव; कारण तो येईपर्यंत आम्ही बसणार नाही."
13 तेव्हा शमुवेलने तेलाचे शिंग घेतले व त्याच्या भावांदेखत दावीदाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून याहवेहचा आत्मा सामर्थ्याने दावीदावर आला. नंतर शमुवेल रामाह येथे परत गेला.