Pular para o conteúdo
Publicidade

1 शमुवेल 17:45-47

OMRCV Marathi Contemporary Version

45 दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, "तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो. 46 आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत. 47 येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    45 दावीदाने पलिष्ट्याला म्हटले, "तू तलवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्राएलाच्या सैन्यांचा परमेश्वर ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझवर येत आहे. 46 परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे. 47 हा सर्व समुदाय जाणेल की, तलवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही. कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.