हन्नाहचे प्रार्थनागीत
1 तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली:
"माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे;
याहवेहमध्ये माझे शिंग2:1 शिंग येथे याचा अर्थ सामर्थ्य उंच केलेले आहे.
माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते,
कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.
2 "याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही;
तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही;
आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.