गथ येथे दावीद
10 त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला. 11 परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, "हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय:
"शौलाने हजारांना वधले,
आणि दावीदाने दहा हजार वधले?"
12 हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली. 13 म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला.
14 आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, "पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले? 15 माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?"