Pular para o conteúdo
Publicidade

1 शमुवेल 23:16-18

OMRCV Marathi Contemporary Version

16 आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले. 17 तो म्हणाला, "भिऊ नकोस, माझा पिता शौल तुझ्यावर हात टाकणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील आणि मी तुझा दुय्यम होईन, हे माझा पिता शौलसुद्धा जाणून आहे." 18 तेव्हा त्या दोघांनी याहवेहसमोर एक करार केला. नंतर योनाथान घरी गेला, परंतु दावीद होरेश येथेच राहिला.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    16 शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्याठायी सबळ केला. 17 तो त्यास म्हणाला, "भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो." 18 तेव्हा त्या दोघांनी परमेश्वराच्यासमोर करार केला. मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.