Pular para o conteúdo
Publicidade

1 शमुवेल 28:7,15

OMRCV Marathi Contemporary Version

7 तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, "माझ्यासाठी एक भूतविद्या जाणकार स्त्रीला शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाऊन तिला विचारेन."

ते म्हणाले, "एक स्त्री एनदोर येथे आहे."

15 शमुवेल शौलास म्हणाला, "मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?"

शौलाने उत्तर दिले, "मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    7 मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, "म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन." तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, "पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे." 15 मग शमुवेल शौलाला म्हणाला, "तू मला वर आणून का त्रास दिला आहे?" तेव्हा शौलाने उत्तर केले, "मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हास बोलावले आहे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.