कोश इस्राएलात परत येतो
1 याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता, 2 तेव्हा पलिष्ट्यांनी याजकांस आणि दैवप्रश्न पाहणार्यांस बोलाविले आणि विचारले, "आम्ही याहवेहच्या कोशाचे काय करावे? त्याच्या मूळ ठिकाणी आम्ही तो कसा पाठवावा."
3 ते म्हणाले, "जर तुम्ही इस्राएलच्या परमेश्वराचा कोश परत पाठवित आहात, तर तो त्यांच्याकडे भेटीशिवाय पाठवू नये! दोषार्पण तर अवश्य पाठवा. म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि त्यांचा हात तुमच्यापासून का दूर होत नाही हे तुम्हाला समजेल."