1 म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले. 2 कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ—म्हणजेच वीस वर्षे राहिला.
शमुवेलाचा मिस्पाह येथे पलिष्ट्यांवर विजय
तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले.