तीमथ्याला खोट्या शिक्षकांचा विरोध करण्याचे काम सोपविले जाते
3,4 मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये.