उपासनेबाबत सूचना
1 तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी. 2 अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे. 3 असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्याला संतोष होतो.