प्रभूचा दिवस
1 आता, बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि घटका याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, 2 कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभूचा दिवस येईल. 3 "शांतता आणि सुरक्षितता," असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.