Pular para o conteúdo
Publicidade

2 इतिहास 20:15-17

OMRCV Marathi Contemporary Version

15 तो म्हणाला, "ऐका, राजा यहोशाफाट आणि जे यहूदीया आणि यरुशलेममध्ये राहतात ते सर्वजण! याहवेह तुम्हाला असे म्हणतात: ‘या विशाल सैन्याला घाबरू नका किंवा निराश होऊ नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, तर परमेश्वराचे आहे. 16 उद्या त्यांच्या विरोधात हल्ला करा. जीजच्या खिंडीने ते वर चढत असतील आणि यरुएलच्या वाळवंटातील खिंडीच्या शेवटी तुम्हाला ते सापडतील. 17 तुम्हाला हे युद्ध करावे लागणार नाही. तुम्ही तुमचे स्थान ग्रहण करा; खंबीरपणे उभे राहा. यहूदीया आणि यरुशलेम पहा, याहवेह तुम्हाला सुटकारा देतील. घाबरू नका; निराश होऊ नका. उद्या त्यांचा सामना करण्यासाठी बाहेर पडा, आणि याहवेह तुमच्याबरोबर असतील.’ "

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    15 यहजीएल म्हणाला, "राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. 16 उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल. 17 तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.