8 प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. 9 कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.
10 परंतु चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जना करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी उघड्या पडतील.