Pular para o conteúdo
Publicidade

कलस्सैकरांस 1:15-20

OMRCV Marathi Contemporary Version

परमेश्वराच्या पुत्राची सर्वश्रेष्ठता

15 त्यांचा पुत्र हे अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहेत, सर्व सृष्टीत प्रथम जन्मलेले आहेत. 16 त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी निर्माण झाल्या: स्वर्गातील गोष्टी आणि पृथ्वीवरील, दृश्य आणि अदृश्य, मग ती सिंहासने किंवा अधिपत्य किंवा शासक किंवा अधिकारी असोत, प्रत्येक गोष्ट त्यांच्याद्वारे व त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. 17 ते सर्व गोष्टींच्या पूर्वी आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी स्थिर राहतात, 18 आणि ते शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहेत, तेच प्रारंभ आहेत; आणि तेच मेलेल्यामधून प्रथम जन्मलेले आहेत, यासाठी की ते प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी सर्वश्रेष्ठ असावे. 19 कारण परमेश्वराची प्रसन्नता यामध्येच होती की, त्यांची सर्व परिपूर्णता येशूंच्या ठायी वसावी, 20 आणि त्यांच्या क्रूसावरील सांडलेल्या रक्ताद्वारे शांती प्रस्थापित करून स्वर्गात व पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा त्यांच्याद्वारे समेट व्हावा.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    15 ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. 16 कारण स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. 17 तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे. 18 तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्यास सर्व गोष्टींत प्राधान्य असावे. 19 हे यासाठी की, त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता. 20 आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टींचा, त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Colossenses
Ver todos os capítulos de Colossenses