बसालेल आणि ओहोलियाब
1 मग याहवेह मोशेला म्हणाले, 2 "पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे. 3 व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— 4 सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी; 5 आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी.