Pular para o conteúdo
Publicidade

यहेज्केल 18:2-4,20

OMRCV Marathi Contemporary Version

2 "याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही इस्राएल देशात ही म्हण वापरता:

" ‘आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली,

आणि लेकरांचे दात आंबले’?

3 "सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ यापुढे तुम्ही इस्राएलमध्ये या म्हणीचा उपयोग करणार नाही. 4 कारण सर्वजण माझे आहेत, आईवडील व लेकरे; दोघेही एकसारखे माझेच आहेत. जे पाप करतील तेच मरतील.

20 जो पाप करतो तोच मरेल. आपल्या आईवडिलांचा दोष त्यांची संतती वाहणार नाही किंवा आईवडील आपल्या संततीचा दोष वाहणार नाहीत. नीतिमानाचे नीतिमत्व त्यांच्यासाठी मोजले जाईल आणि दुष्टाची दुष्टता त्यांच्याविरुद्ध मोजली जाईल.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    2 "वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले," याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो. 3 मी शपथ घेतो, "हे परमेश्वर देव जाहीर करतोय" निश्चितच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही. 4 पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल. 20 जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.