5 परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले, 6 तेव्हा याहवेह म्हणाले, "हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही. 7 चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही."
8 अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. 9 म्हणून त्या शहराला बाबिलोन11:9 किंवा बाबिलोन अर्थात् गोंधळ म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.