Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ती 12:1-4

OMRCV Marathi Contemporary Version

अब्रामास पाचारण

1 याहवेहने अब्रामाला सांगितले होते, "तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.

2 "मी तुला एक मोठे राष्ट्र करेन,

मी तुला आशीर्वाद देईन;

आणि तुझे नाव महान करेन

आणि तू एक आशीर्वाद असा होशील.12:2 किंवा तुझ्याकडे आशीर्वाद म्हणून पाहिले जाईल

3 जे तुला आशीर्वाद देतील,

त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील,

त्यांना मी शाप देईन;

आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील."12:3 किंवा आशीर्वाद देताना तुझ्या नावाचा उच्चार करतील

4 याहवेहने सूचना केल्याप्रमाणे अब्राम निघाला; आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राम हारान येथून निघाला त्यावेळी तो पंचाहत्तर वर्षांचा होता.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    1 आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, "तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. 2 मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील, 3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील." 4 परमेश्वराने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे त्याने केले, तो गेला आणि त्याच्याबरोबर लोट गेला. त्याने हारान सोडले त्या वेळी अब्राम पंचाहत्तर वर्षांचा होता.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.