Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ती 37:3,4,28

OMRCV Marathi Contemporary Version

3 इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला. 4 जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.

28 मिद्यानी व्यापार्‍यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल37:28 अंदाजे 230 ग्रॅ. चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्‍यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    3 इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता. 4 आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत.

    28 ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी230 ग्राम चांदी किंवा एका दासाची किंमत घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.