Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ती 45:1,4,5,15

OMRCV Marathi Contemporary Version

योसेफ आपल्या भावांना ओळख देतो

1 आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, "सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!" योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले.

4 तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, "माझ्याजवळ या!" ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, "ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे! 5 तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले.

15 मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांच्यासह रडला आणि नंतर त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    1 आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, "येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा." तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली. 4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, "मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या." तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, "तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले. 5 आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. 15 मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.