9 यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस.
माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो.
सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो,
सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?
10 यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही,
किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही,
ज्याचे जे आहे49:10 किंवा त्याच्यापासून त्याचे संतान तो येईपर्यंत,
राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.