8 मग परमेश्वर नोआहला व त्याच्या पुत्रांना म्हणाले: 9 "आता मी तुझ्याशी व तुझ्या वंशजांशी करार स्थापित करतो. 10 तुम्ही तुमच्याबरोबर तारवातून आणलेल्या—पक्षी, गुरे आणि वन्यपशू—अशा सर्वप्रकारच्या सजीव प्राण्यांशी करार करतो. 11 यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो."
Publicidade
Publicidade