सतर्कतेचा इशारा व प्रोत्साहन
14 सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही. 15 परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.