हबक्कूकची तक्रार
2 हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा?
पण तुम्ही ऐकत नाहीत?
मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, "हिंसा!"
पण तुम्ही वाचवित नाहीत.
3 तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता?
तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता?
विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे;
वाद व कलह वाढत आहेत.