दुराग्रही राष्ट्राचा धिक्कार असो
1 याहवेह असे घोषित करतात,
"दुराग्रही संततीचा धिक्कार असो,
ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात,
नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही,
पापावर पापाचा ढीग रचतात;
2 जे माझा सल्ला न घेता
इजिप्तकडे जातात;
जे आश्रयासाठी इजिप्तच्या सावलीची
फारोहच्या रक्षणासाठी मदतीची अपेक्षा करतात.
3 परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल,
इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल.
15 सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात:
"पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे,
शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे,
परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल.