13 कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे,
जो तुमचा उजवा हात धरतो
आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको;
मी तुला साहाय्य करेन.
14 हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको,
हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस,
कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन," असे याहवेह,
तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,