18 याहवेह असे म्हणतात—
ज्यांनी आकाशे निर्माण केली
तेच परमेश्वर आहेत;
ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली,
ती प्रस्थापित केली;
ती ओसाड व निर्जन घडविली नाही,
परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली—
ते म्हणतात:
"मीच याहवेह आहे.
माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.