13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करेन.
येशूंचे पवित्र आत्मा देण्याबद्दल अभिवचन
15 "जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा. 16 आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—