Pular para o conteúdo
Publicidade

योहान 19:4-6

OMRCV Marathi Contemporary Version

4 मग पिलात पुन्हा एकदा बाहेर आला आणि तिथे जमलेल्या यहूद्यांना म्हणाला, "पाहा, मी आता त्याला तुमच्यापुढे बाहेर आणत आहे, परंतु लक्षात ठेवा की मला त्याच्या ठायी कोणताही अपराध सापडला नाही." 5 येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, "हा तो मनुष्य!"

6 येशूंना पाहताच मुख्य याजक व त्यांचे अधिकारी ओरडू लागले, "क्रूसावर खिळा! क्रूसावर खिळा!"

परंतु पिलाताने उत्तर दिले, "तुम्हीच त्याला घेऊन जा आणि त्याला क्रूसावर खिळा. कारण माझ्या दृष्टीने पाहिले तर, त्याच्यावर दोष ठेवण्यासाठी मला कोणताही आधार सापडत नाही."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    4 म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन, म्हटले, "पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो." 5 तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, "पाहा, हा मनुष्य!" 6 मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला "वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा." पिलात त्यांना म्हणाला, "तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.