तळ्याजवळ बरे करणे
1 काही काळानंतर, येशू यहूद्यांच्या सणांपैकी एकास यरुशलेम येथे गेले. 2 आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरामी5:2 अरामी किंवा हिब्रू भाषेत बेथेस्दा5:2 किंवा बेथसैदा म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या. 3 येथे लंगडे, आंधळे, लुळे असे अनेक अपंग लोक पडून असत. 4 कारण प्रभूचा दूत वेळोवेळी येऊन, ते पाणी हालवीत असे. पाणी हालविताच कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती तळ्यात प्रथम उतरल्यास बरी होत असे.5:4 काही मूळ प्रतींमध्ये पाणी हालविले जावे म्हणून अपंग वाट पाहत होते आणि पाणी हालविल्यानंतर त्या तळ्यात प्रथम उतरणारी व कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती बरी होत असे 5 तिथे अडतीस वर्षे अपंग असलेला एक मनुष्य होता. 6 येशूंनी त्याला तिथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून त्याला विचारले, "तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?"
7 "प्रभूजी," तो अपंग म्हणाला, "पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो."
8 तेव्हा येशू त्याला म्हणाले, "ऊठ आणि आपले अंथरूण उचल आणि चालू लाग." 9 त्याच क्षणी तो मनुष्य बरा झाला आणि आपले अंथरूण उचलून चालू लागला.
ज्या दिवशी हे घडले तो शब्बाथ दिवस होता.