4 त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व4:4 किंवा न्याय करत होती. 5 तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत.