Pular para o conteúdo
Publicidade

नीतिसूत्रे 25

1 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्‍यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत:

2 रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे;

आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे.

3 जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली,

तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही.

4 चांदीतील मळ काढला

म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो;

5 राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका

आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील.

6 राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस,

आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस;

7 त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा,

यापेक्षा "इकडे वर ये" असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल.

तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे

8 ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस,

कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल,

तर शेवटी तू काय करशील?

9 जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर,

दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस,

10 नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल

आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल.

11 योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा

चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे.

12 न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्‍या कानासाठी सुज्ञ

म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे.

13 ज्याने विश्वासू सेवकाला पाठविले

त्याच्यासाठी तो उन्हाळ्यातील शीतल पेयासारखा आहे;

तो त्याच्या मालकाला ताजेतवाने करतो.

14 कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो,

तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे.

15 सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते,

कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते.

16 तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा—

जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल.

17 तुझ्या शेजार्‍यांकडे पाय क्वचितच टाक—

अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील.

18 शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे,

जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.

19 संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे

म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे.

20 ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे,

एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे,

किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे.

21 तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या;

तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे.

22 असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल,

आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.

23 जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो

तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.

24 भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा

छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.

25 दूरवरून आलेला शुभ संदेश

तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे.

26 नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे,

हे पाण्याचा झरा दूषित होणे किंवा जलकुंड गढूळ होण्यासारखे आहे.

27 जसे अति मध खाणे हानिकारक आहे

आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते.

28 स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य

तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा आहे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.