21 त्यावेळी येशू पवित्र आत्म्याद्वारे आनंदित होऊन म्हणाले, "हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्यांपासून या गोष्टी गुप्त ठेवल्या आणि लहान बालकांना प्रगट केल्या, म्हणून मी तुमचे आभार मानतो कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.