14 त्यांच्याविषयी यशायाह संदेष्ट्याची ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे:
" ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही,
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.
15 या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा;
त्यांचे कान मंद
आणि त्यांचे डोळे बंद करा.
नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील,
त्यांच्या कानांनी ऐकतील,
अंतःकरणापासून समजतील,
आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’13:15 यश 6:9