प्रथम शिष्यांस पाचारण
18 येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते. 19 येशू त्यांना म्हणाले, "चला माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन."