होशेयचा आपल्या पत्नीशी समेट
1 मग याहवेह मला म्हणाले, "जा आणि आपल्या पत्नीस आपली प्रीती पुनः प्रकट कर, जरी तिला दुसरा कोणता पुरुष प्रीती करतो आणि ती एक व्यभिचारिणी आहे. जरी ते इतर दैवतांकडे वळले असून पवित्र मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी याहवेह इस्राएली लोकांवर प्रीती करतात."
2 तेव्हा मी तिच्या सुटकेसाठी चांदीची पंधरा शेकेल3:2 अंदाजे 170 ग्रॅ. व एक होमेर व एक लेथेक3:2 अंदाजे 195 कि.ग्रॅ. जव देऊन तिला विकत घेतले. 3 मग मी तिला म्हणालो, "तुला अनेक दिवस माझ्याबरोबर राहवयाचे आहे; जारकर्म करू नकोस अथवा इतर पुरुषांकडे जाऊ नकोस, आणि मीही तुझ्यासोबत तसाच वागेन."