Pular para o conteúdo
Publicidade

होशेय 6

लोकांचा खोटा पश्चात्ताप

1 "चला, आपण याहवेहकडे परत जाऊ.

त्यांनी आम्हाला फाडले आहे,

व तेच आम्हाला बरे करतील;

त्यांनी आम्हाला जखम केली आहे,

व आता तेच पट्टी बांधतील.

2 ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील;

तिसर्‍या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील,

जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू.

3 चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या;

चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या.

सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे,

तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे;

हिवाळ्यातील पावसाप्रमाणे,

पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील."

4 "एफ्राईमा मी तुमचे काय करू?

यहूदाह मी तुमचे काय करू?

कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे,

पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते.

5 म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे,

माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले—

तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो.

6 कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे,

आणि होमार्पण पेक्षा परमेश्वराचे ज्ञान प्रिय आहे.

7 आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे;

तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते.

8 गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे,

त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत.

9 जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात,

तसेच याजकांच्या टोळ्या

शेखेमाच्या वाटेवर वध करतात,

ते आपल्या दुष्ट योजना पूर्ण करतात.

10 मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे:

एफ्राईम वेश्याव्यवसाय करण्यास दिला आहे,

इस्राएल अपवित्र झाला आहे.

11 "हे यहूदाह, तुझ्यासाठी

हंगामाची वेळ नेमलेली आहे.

"जेव्हा मी माझ्या लोकांना जुन्या दिवसात पुनर्स्थापित करेन,

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.