10 तर तू आपल्या बंधूला व भगिनीला दोषी का ठरवितोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का मानतोस? आपणा सर्वांस परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहवयाचे आहे. 11 कारण असे लिहिले आहे:
" ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’
‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल;
आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ "14:11 यश 45:23
12 तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.