5 कोणी मनुष्य एखादा दिवस दुसर्या दिवसापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो; आणखी कोणी सर्व दिवस सारखेच मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाने पूर्ण खात्री करून घ्यावी. 6 जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो.