नाओमीच्या पती आणि पुत्रांचा मृत्यू होणे
1 त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन1:1 किंवा न्यायनिवाडा करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला.