3 त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्या असाव्या; 4 म्हणजे त्या तरुण स्त्रियांस त्यांच्या पतींवर आणि मुलांवर प्रीती करण्यास, 5 आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.