Família de Deus
A família de Deus transcende laços de sangue. Em Cristo, somos adotados como filhos, irmãos uns dos outros e membros de uma família eterna — a Igreja.
Adotados por Deus
Recebemos o espírito de adoção pelo qual clamamos: Abba, Pai! Se filhos, também herdeiros — herdeiros de Deus e co-herdeiros com Cristo.
कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे. तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस. अनी जर पोऱ्या तर वारीस बी शेतस, म्हणजे देवना वारीस, ख्रिस्तनासंगे सोबतना वारीस असे शेतस; आपलाले त्यानासंगे गौरव प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानासंगे जर दुख भोगना पडना तरच.
परंतु काळनी पुर्णता व्हयनी तवय देवनी आपला पोऱ्याले धाडं; तो स्त्रीपाईन जन्मेल, नियमशास्त्रनाधीन असा जन्मेल व्हता. ह्यामा हाऊच उद्देश व्हता की, ज्या नियमशास्त्रनाधीन व्हतात त्यासले त्यानी खंडणी भरीन सोडावाले पाहिजे, अनी आपलाले पोऱ्याना अनी पोरना हक्क मिळाले पाहिजे. तुम्हीन देवना पोऱ्या अनी पोरी शेतस, म्हणीन देवनी अब्बा, बाप्पा, अशी हाक मारणारा आपला पोऱ्याना आत्माले तुमना आमना अंतःकरणमा धाडेल शे. म्हणीन तुम्हीन आतेपाईन नोकर नहीत तर पोर अनी पोऱ्या शेतस; अनी पोर अनी पोऱ्या शे म्हणीन तर देवनाद्वारा वारीस बी शेतस.
कारण तुम्हीन सर्व ख्रिस्त येशुवरला ईश्वासनाद्वारा देवना पोऱ्या शेतस. कारण तुमनामधला जितलासना ख्रिस्तमा बाप्तिस्मा व्हयना शे तितलासनी ख्रिस्तनं जिवन परीधान करेल शेतस; यहूदी अनं गैरयहूदी, गुलाम अनं स्वतंत्र, पुरूष अनं स्त्री, हाऊ भेदभाव नही; कारण तुम्हीन सर्वाजण ख्रिस्त येशुमा एकच शेतस;
देवनी आपला मनना संकल्पप्रमाने आपलाले येशु ख्रिस्तपाईन त्याना पोऱ्या व्हवाकरता प्रेमतीन पहिलेच नेमेल शे. त्यानी आपला प्रिय पोऱ्या पाईन देवनी देयल कृपाबद्दल आपन त्याना गौरवनी स्तुती कराले पाहिजे.
ख्रिस्तनी प्रिती
त्या पितानासमोर मी गुडघा टेकिसन अशी प्रार्थना करस; स्वर्गमातील अनं पृथ्वीवरला प्रत्येक वंशसले ज्या पितावरतीन नाव देवामा येसं.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा. तो रक्तघाई नही, शरिरना ईच्छाघाई नही, अनी मनुष्यना ईच्छाघाई नही, पण परमेश्वरना ईच्छातीन उत्पन्न व्हयेल शे.
A comunidade de fé
Não abandonem a congregação. Somos um corpo em Cristo, membros uns dos outros, chamados a amar e a servir.
आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे? जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस. शिवाय शिक्षा करनारा असा शारिरीक बाप आपले व्हतात अनी आपण त्यासनी आस धरी, तर मंग आपण विशेष करीसन जो जिवत अनी आत्मिक पिता त्याना अधीन राहीसन जिवत ऱ्हावाले नको का! कारण आपला शारिरीक बाप त्यासना मनले पटनं तशी थोडा दिन शिक्षा करी, पण देव जे करस ते आपला हितकरता, म्हणजे आपण त्याना पवित्रपणना भागीदार व्हवाले पाहिजे म्हणीसन करस.
तसं आपण बराच राहीसन ख्रिस्तमा एक शरीर शेतस; अनी आपण सर्वाजण एकमेकसना अवयव शेतस.
एक अवयव दुःखी व्हयना तर त्यानासंगे सर्व अवयव दुःखी व्हतस; एक अवयवनी वाहवा व्हयनी तर त्यानाबरोबर सर्व अवयव आनंदीत व्हतस.
तर यावरतीन तुम्हीन आत्तेपाईन परका किंवा विदेशी नहीत पण पवित्र जणसना बराबरीना अनी देवना घरना शेतस. प्रेषित अनी संदेष्टा या पायासवर तुम्हीन रचेल शेतस; स्वतः ख्रिस्त येशु मुख्य कोणशीला शे. त्यानामा पुरी इमारत जोडीसन रचेल शे प्रभुमा वाढत वाढत पवित्र मंदिर व्हस. प्रभुमा तुम्हीन बी आत्मानाद्वारे देवनं घर एकत्र रचाई जाई राहीनात.
Quem é minha família?
Jesus disse: quem faz a vontade de Deus, esse é meu irmão e irmã. A família de Deus inclui todos os que creem.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "कोण मनी माय? अनी कोण मना भाऊ?" मंग त्यानी तठे बशेल लोकसकडे दखीसन सांगं, "दखा! हाई मनी माय अनी ह्या मना भाऊ, बहिण! कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय."
गुलाम घरमा सदासर्वदा ऱ्हास नही, पोऱ्या सदासर्वदा ऱ्हास.
येशुनी त्यासले सांगं, "देव जर तुमना बाप ऱ्हाता तर तुम्हीन मनावर प्रिती करतात; कारण मी देवपाईन निंघेल अनी येल शे, मी स्वतःवहीन येल नही शे, तर त्यानी माले धाडेल शे.
ईश्वासी लोकसबद्दल जबाबदारी
वडील लोकसले वरडीन बोलानं नही, तर त्यासले बाप मानीसन, तरूणसले भाऊ मानीसन बोध कर; वयस्कर बायासले माय मानीसन, तरूणीसले बहिण मनीसन, पुर्ण शुध्दतातीन बोध कर.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही. मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
तर मंग जश आपलाले येळ भेटी त्यानाप्रमाणे आपण सर्वासना अनं विशेष म्हणजे ईश्वासी कुटूंबना लोकससंगे चांगलं करानं.