Honrar os pais
Honrar pai e mãe é mandamento de Deus com promessa de vida longa e feliz. A Bíblia ensina que respeitar, obedecer e cuidar dos pais é dever sagrado dos filhos.
O mandamento com promessa
Honra a teu pai e a tua mãe para que vá bem contigo e vivas muito tempo sobre a terra. É o primeiro mandamento com promessa.
आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.
"तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा" अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. "यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा."
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. "तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा" अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. "यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा."
पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो.
Obedecer e respeitar
Filhos, obedecei a vossos pais no Senhor. Ouvir a instrução do pai e não desprezar o ensino da mãe traz sabedoria.
पापी लोकांच्या आमंत्रणाविषयी सावधान
माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे
आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
पापी लोकांच्या आमंत्रणाविषयी सावधान
माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे
आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे
आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे.
कोणतीही किंमत देऊन ज्ञान प्राप्त कर
माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका;
त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा.
सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो,
परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही.
सतरावे सूत्र
आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले,
आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.
येशूंनी उत्तर दिले, "तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता? परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’ आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’
येशूंनी उत्तर दिले, "तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता? परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’ आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’ परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे. अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता.
Consequências da desonra
A Bíblia adverte severamente contra a desonra aos pais. Quem amaldiçoa ou agride os pais enfrenta consequências sérias.
जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात,
ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते.
जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो,
त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल.
"आपल्या वडिलांचा चेष्टा करणारे डोळे,
आणि वृद्ध आईचा तिरस्कार करणारे डोळे,
दरीतील डोमकावळे टोची मारून बाहेर काढतील,
त्यांची शरीरे गिधाडे खातील.
"जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.
हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसांमध्ये कठीण संकटाचे काळ येतील. लोक स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, बढाईखोर, परमेश्वराचा उपहास करणारे, मातापित्यांची अवज्ञा करणारे, दयाहीन, अपवित्र, ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे,
Cuidar dos pais
Quem não cuida dos seus, principalmente de sua família, negou a fé. Honrar os pais inclui respeitar os idosos.
परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.
परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्यापेक्षा वाईट आहे.
" ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
" ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे.