24 देवना उपकार मानीन ती मोडीसन सांगं, तुमनाकरता जे मनं शरीर ते हाई शे, मना आठवणकरता हाई करा. 25 मंग जेवण व्हवानंतर प्याला लिसन त्यानी तसच करं, अनी सांगं, हाऊ प्याला मना रंगतमा नवा करार शे; जितलांदाव तुम्हीन हाऊ पितस तितलांदाव मना आठवणकरता हाई करा.
26 कारण जितलांदाव तुम्हीन हाई भाकर खातस, अनं हाऊ प्याला पितस तितलांदाव तुम्हीन प्रभुना मरणनी तो येईपर्यंत घोषणा करतस. 27 जो कोणी अयोग्य प्रकारतीन ती भाकर खास, अनं हाऊ प्याला पि, तो प्रभुनं शरीर अनं रक्त यानाबद्दल दोषी व्हई 28 यामुये मनुष्यनी स्वतःनी परिक्षा कराले पाहिजे अनी मंग त्या भाकरमातीन खावाणं अनं त्या प्यालामातीन पेवाणं.